तळोद्यात शाकाहारी दिवस साजरा समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम ..
तळोदा येथील भारतीय जैन संघटनेतर्फे विश्व शाकाहारी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात जनजागृती करण्यात आली. ठीक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात वाटप करण्यात आली. नागरिकांना शाकाहारायचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस निमित्त दक्षिण काशी प्रकाशा येथे केदारेश्वर सद्गुरु धर्मशाळा संचलित वृद्धाश्रमातील वृद्ध स्त्री-पुरुषांना विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मिठाईचे पॅकेट वाटप करण्यात आले. भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्ध स्त्री पुरुषांच्या सहवासात एक दिवस घालवला त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.
याप्रसंगी सद्गुरु धर्मशाळा वृद्धाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष मोहन चौधरी, हेमंत वाणी, मानक पाटील, अरुण पाटील, नारायण पाटील, लड्डू पाटील, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन, रमेश कुमार भाट यांचे सह वृद्धाश्रमाचे इतर संचालक भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी सदस्य याप्रसंगी उपस्थित होते. सद्गुरु धर्मशाळा ट्रस्ट संचलित वृद्धाश्रमातील वृद्ध श्री पुरुषां ना गोडधोड मिठा इ पॅकेट दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर वाटप करण्यात आले. आपले जवळचे नातलग कुटुंबीयांपासून वेगळे एकटे वृद्धाश्रमात एकाकी जीवन जगणारे वृद्धांना सामाजिक सेवाभावी संस्थांच्या सेवाभाव आपुलकी व माणुसकीने वृद्धाश्रमातील वृद्धही भारावले क्षणभर ते आपले एकाकी जीवन विसरले समाजाने दाखवलेल्या आपुलकीने ते भारावले त्यांचे डोळे भरून आले त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना भरभरून आशीर्वाद दिले. शाकाहारी दिवसानिमित्त शहरातून भित्तिपत्रक वाटप करून ते ठीक ठिकाणी लावण्यात आले. यात जेष्ठ कार्यकर्ते कीर्ती कुमार शहा, प्राध्यापक डॉ. संजय कुमार शर्मा, एडवोकेट अल्पेश जैन, पंडित भामरे, प्रा. राजाराम राणे, शरद सूर्यवंशी, रमेश कुमार भाट, प्रा. पूजा जैन, रशिलाबेन देसाई, अमीबेन तुरखिया यांचे सह भारतीय जैन संघटना चे सदस्य उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments