"युवकांनी अपंगांच्या जगण्याबद्दल संवेदनशील व्हावे" : दिक्षा दिंडे
तळोदा अध्यापक शिक्षण मंडळद्वारा संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 09 ऑक्टोबर रोजी ईकविब्रिज फाउंडेशन पुणे ज्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या इनक्लूजन यात्रेने त्यांनी तळोदा महाविद्यालयात भेट घेऊन महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधला.
या संवाद यात्रेत त्यांनी अपंगांचे सामाजिक शैक्षणिक व राष्ट्रीय जीवनामध्ये समावेश करून घेऊन त्यांचा जगणं सुलभ कसे करता येईल याकडे लक्षवेधले अपंग हे समाजातील अत्यंत दुर्लक्षित घटक असून समाजाने त्यांच्या प्रश्नांकडे व मानवी हक्कांकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पहावे असा संदेश दिला. या संवाद यात्रेत त्यांच्यासोबत अमोल सुतार व कवी कमलेश महाले सोबत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ एस एन शर्मा हे होते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून अपंगांच्या समस्यांबद्दल सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून विद्यार्थ्यांनी बघावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ.जे.एन. शिंदे व डॉ. पराग तट्टे उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments