राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे नंदुरबार दौरा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत
नंदुरबार | राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यातील भेटीअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नगरपरिषदांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला असून, अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादर करण्यात आली.
या चर्चेद्वारे सामाजिक न्याय, समावेशक विकास आणि शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, “जिल्हा प्रशासन सामाजिक न्याय व समतोल विकासासाठी कटिबद्ध असून, अनुसूचित जाती समाजाच्या प्रगतीसाठी सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.”
.
.
.
#Nandurbar #DistrictAdministration #DrMitaliSethi #DharmapalMeshram #SCCommission #SocialJustice #InclusiveDevelopment #GoodGovernance #TeamNandurbar #SocialEmpowerment #UrbanDevelopment #SCWelfare #MaharashtraGovernment #DigitalNandurbar





Post a Comment
0 Comments