तळोद्यातील डॉ. दीपक शेंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संचलित, नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे नुकतेच नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून एकूण सात शिक्षकांची निवड करण्यात आली. यात तळोदा तालुक्यातील सोमावल बुद्रुक येथील दुधाबाई पाडवी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डॉ. दीपक अंबालाल शेंडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. यावेळी आदिवासी भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी, उपाध्यक्षा अर्चनाताई पाडवी, सचिव नितीन पाडवी व सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर मराठे व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी डॉ. दीपक शेंडे यांचे कौतुक केले.

Post a Comment
0 Comments