आमलाड आरोग्यवर्धिनी केंद्र येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न
तळोदा तालुक्यातील आमलाड येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे नेत्र तपासणी शिबिरात ५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ७ रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे.
तळोदा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार व प्रा. आ. केंद्र प्रतापपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योसेफ गावित व डॉ.दिनेश रावताळे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा रुग्णालय नंदुरबार व आरोग्यवर्धिनी केंद्र आमलाड व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यवर्धिनी केंद्र आमलाड येथे नेत्र तपासणी शिबिर पार पडले, यामध्ये एकूण 52 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे नेण्यात येणार आहे.
यावेळी आरोग्यवर्धिनी केंद्र आमलाड चे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुमित वाणी, उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथून नेत्र तपासणी साठी आलेल्या डॉ.अश्विनी यांनी रुग्ण तपासणी केली, सोबत श्रीमती. यू एम गायकवाड (आरोग्यसेविका), वासुदेव गवळी (आरोग्यसेवक), समता फाऊंडेशन चे श्रावण पाडवी व सर्व आशाताई यांनी तपासणी शिबिराचे नियोजनार्थ कामकाज पाहिले.

Post a Comment
0 Comments