मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या विभागीय स्तरावर निवड
तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थांनी जिल्हा स्तरीय मैदानी खेळात घवघवीत यश प्राप्त केले असून तीन विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड झाली आहे. 14 वर्ष वयोगटात निधी साळवे या विद्यार्थ्यांनी ची थाळी फेक स्पर्धेत तर 17 वर्ष गटात बुद्धिबळ स्पर्धेत नगरकर प्राजक्त सचिन व थाळी फेक स्पर्धेत शिंदे वैष्णवी विजय या विद्यार्थ्यांनीची विभाग स्तरावर निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. राजेश वळवी, अध्यक्ष मार्था सुतार , समन्वयक सौ. नूतन वर्षा तसेच शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments