Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) नवीन कार्यकारिणी निवड

तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) नवीन कार्यकारिणी निवड

 तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूल येथे झालेल्या बैठकीत तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) सन 2025-2028 ची तालुका कार्यकारणीची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

         तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) ची जिल्हा कार्यकारणीचे निरिक्षक डी. सी. पटेल, माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक निमेश सुर्यवंशी, माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अजित टवाळे, तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव व मुख्याध्यापक सुनिल परदेशी उपस्थित होते.

                             यावेळी तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्षपदी प्रकाश महेंद्र वानखेडे (तळोदा) यांची  तर उपाध्यक्षपदी चेतन सुर्यवंशी (मोदलपाडा) व विलास मगरे (तुळाजा), सचिव रघुवीरसिंग कुवर (आमलाड), कार्याध्यक्ष समाधान पाटील (चिनोदा),  प्रसिध्दीप्रमुख यु. एम. मगरे (गणेश बुधावल), कोषाध्यक्ष के.ए.टवाळे (मालदा),  सहकार्यवाह वाय. एल. मोरे (राजविहीर), महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती सुजाता रमाकांत साळवे (राजविहीर), जिल्हा प्रतिनिधी म्हणून गजानन बन्सीलाल काटे (राजविहीर), अमरिश रमेश सुर्यवंशी (तळोदा), मनोज जगन्नाथ जावरे (चिनोदा), संतोष सांबरसिंग ठाकरे (तळोदा), तसेच 

तळोदा तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) तालुका अध्यक्ष म्हणून  रमेश ईश्वरलाल चव्हाण (तळोदा), उपाध्यक्ष जगदीश भोजराज माळके (चिनोदा),  फिरोज शेख महमंद शेख (मोदलपाडा), सचिव   विनोद भिकनराव पगार (तळोदा), कार्याध्यक्ष हर्षल राजेंद्र कलाल (बोरद), प्रसिध्दीप्रमुख निशांत दौलत मोरे (तळोदा), कोषाध्यक्ष संजय गोरख तनपुरे (तळवे) कार्यवाह रविंद्र अरुण गुरव (तळोदा),  तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून किशोर शांताराम माळी (तळोदा), अतुल पांडुरंग सुर्यवंशी (सोमावल), सचिनकुमार जगदीशभाई पंचभाई (तळोदा), सुशिलकुमार अशोक सुर्यवंशी (आमलाड) सर्व कार्यकारणीची बिनविरोध निवड खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली.

Post a Comment

0 Comments