खांडबारा पी यू अंतर्गत मोगराणी गावात लुपिन फाऊंडेशन दिवस साजरा
नवापूर तालुक्यातील खांडबारा पी. यू . अंतर्गत मोगराणी गावात दीं . 3 रोजी लुपिन फाऊंडेशन दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात देशबंधू गुप्ता सर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांसाठी पोषक आहार मार्गदर्शनासह राजगिरा लाडू व खजूर चिक्कीचे वाटप व गावातील महिला व शेतकरी बांधवांसाठी आरोग्य शिबिर ,रक्त तपासणी केली.
नवापूर तालुक्यातील मोगराणी गावातील लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशन अंतर्गत बेटर कॉटन प्रकल्पातर्फे 03 ऑक्टोबर 2025 या दिवशी फाउंडेशन दिवस आयोजन करण्यात आले. त्यात लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या बेटर कॉटन या प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रम या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी राबवले जातात, आरोग्य शिबिर घेण्यात आले. रक्त तपासणी,वजन, हिमोग्लोबिन,मातामुलांचे आरोग्य सुधारावे, पोषणपातळी उंचवावी आणि समाजात पोषक आहाराबाबत जागरूकता वाढावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेंडर लीड श्रीमती मोहिनी पाटील केले. खांडबारा पी.यु. व्यवस्थापक सुरेश चौरे यांनी लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या मार्फत राबवले जाणारे उपक्रम व त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती दिली,मार्गदर्शन प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील, प्रकल्प समन्वयक.चंदन टोक्षा नंदुरबार जिल्हा समन्वयक यांचे लाभले.
डॉक्टर सुरज बैरागी व डॉक्टर राहुल पवार , माने मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर त्यांनी उपस्थित मातांना व महिलांना, शेतकरी बांधवांना ऍनिमिया आजाराचे विशेष मार्गदर्शन व त्याचे कारण,लक्षण,उपाय यावर मार्गदर्शन महिला मधील समतोल आहार, स्वच्छता व आराम यावर मार्गदर्शनव व आरोग्य तपासणी केली.
गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी अडचणी, संतुलित आहाराचे महत्त्व, गर्भारपणातील पोषण, स्तनपानाची गरज आणि लहान मुलांच्या विकासासाठी आवश्यक अन्नघटक याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. संतुलित आहार न मिळाल्यास होणारे दुष्परिणाम आणि स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या पोषक आहाराचा वापर कसा करावा, हेही स्पष्ट करण्यात आले.
लुपिन फाऊंडेशनतर्फे या प्रसंगी गरोदर माता, स्तनदा माता व गावातील किशोवयीन मुलींना राजगिरा लाडूचे पाकिट , खजुर व चिक्की वाटप करण्यात आले.व पोषक आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात महिलांनी व बालकांनी शेतकरी वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. फाउंडेशन दिवस यशस्वी करण्यासाठी सरपंच सुशीला संजय कोकणी, पोलीस पाटील जितेंद्र कोकणी,ग्रामपंचायत मोबिलीझर, अंगणवाडी सेविका , आशावर्कर जेंडर सदस्य हेमा ताई,परिचारिका व तसेच सर्व कृषी मित्रांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाडवी यांनी केले व शेवटी जेंडर लिड श्रीमती. सूमा पाडवी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
फाउंडेशन दिवस निमित्त कार्यक्रमाला ग्रामस्तरीय समाजाला एक चांगला संदेश देऊन आरोग्य विषयी, पोषण शिक्षण देण्याचे काम केल्याने महिलांमध्ये व मातामुलांमध्ये, शेतकरी बांधवामध्ये जागरूकता वाढून त्याचा फायदा दीर्घकाळ समाजाच्या आरोग्य व्यवस्थेला होईल, सुधारित शेती पद्धतीला, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments