तळोदा तालुका कृषी दुकानदार युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर..
अध्यक्षपदी निलेश पाटील, उपाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी तर सचिव पदी अमित ठक्कर यांची निवड..
तळोदा तालुका कृषी दुकानदार युनियनची नूतन कार्यकारिणी नुकतीच निवड करण्यात आली. अध्यक्षपदी कृषिधनचे संचालक निलेश शांतीलाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून दीपक सूर्यवंशी, तर सचिवपदी अमित ठक्कर यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणीत सदस्य म्हणून अनिल राजपूत, संदीप जोहरी, नितेश शिंदे, निखिल भावसार, राहुल पटेल, सागर पटेल, सुशील मगरे आणि अरुण वळवी यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व कृषी दुकानदारातर्फे सत्कार करण्यात आला असून संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कृषी दुकानदारांच्या समस्या सुलभ पद्धतीने सोडवून शेतकरी वर्गाला अधिक चांगली सेवा देण्यास युनियन कटिबद्ध राहील, असा विश्वास नूतन अध्यक्ष निलेश पाटील यांनी व्यक्त केला.
निलेश पाटील नूतन अध्यक्ष तळोदा

Post a Comment
0 Comments