पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आढावा बैठक संपन्न
नंदुरबार, :- “वेळेत निधी, वेळेत काम आणि पारदर्शकता” या तत्त्वावर आधारित शासनाचा नवा निर्णय जिल्हा विकासासाठी गती देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा आढावा बैठकीत केले.
ते म्हणाले – अनेकदा निधी वर्षाच्या शेवटी खर्च होतो किंवा तरतूद न वापरता शिल्लक राहते. यामुळे जनतेला त्वरित लाभ मिळत नाही.
शासनाने आता निधी वेळेत वापरणे, पुनर्विनियोजनाची मर्यादा (10% पर्यंत, डिसेंबर अखेरपर्यंत), ई-निविदा प्रणाली, वर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट (VPDA) यासारखी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली आहे.
जिल्हाधिकारी व समिती सदस्यांनी किमान 10% कामांची, तर उपआयुक्त (नियोजन) यांनी 5% कामांची प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक आहे.
2023-24 मधील न वापरलेला निधी लॅप्स झाल्याने जबाबदार अधिकारी, यंत्रणा व ठेकेदारांवर कार्यवाही होणार आहे. 2024-25 मधील कामे वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असून 2025-26 चा संपूर्ण निधी मार्चअखेर खर्च होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा यंत्रणांना भविष्यात निधी मिळणार नाही.
या बैठकीत दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले –
“प्रकाशवाटा” – 200 विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षण, स्पर्धा परीक्षा व रोजगार संधी.
“शाश्वत विकास ध्येये” जिल्हा निर्देशांक अहवालाचे प्रकाशन.
या बैठकीस माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार शिरीषकुमार नाईक, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासात आर्थिक शिस्त – वेळेवर निधी – वेळेवर काम या शासन तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सर्व यंत्रणांना केले.
#Nandurbar #PalakMantri #ManikraoKokate #MitaliSethi #DistrictReviewMeeting #Development #Transparency #GoodGovernance #Prakashwata #SDGs #Maharashtra







Post a Comment
0 Comments