Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शेजवा बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा

शेजवा बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा 

           नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.


          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते त्यांच्या हस्ते भारतरत्न ,मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून वाचन प्रेरणा दिवसाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे क्रीडा शिक्षक विजय पवार, रामानंद बागले, संजय बोरसे ,श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनीही डॉ. ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या विषयी भाषणे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षक दीपक वळवी यांनी केले तर सूत्रसंचालन  हारून खा शिकलीगर यांनी केले तर आभार संदीप गायकवाड यांनी मानले . यावेळी  शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्ताका चे वाचन करून प्रेरणा दिवस साजरा केला.सदरील  कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय बसावे दिनेश पवार समीर वसावे यादीने परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments