Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्षपदी भिका चव्हाण यांची सर्वानुमते निवड

 तळोदा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्षपदी भिका चव्हाण यांची सर्वानुमते निवड 

            तळोदा:- अखिल भारतीय ग्राहक पंचायत  तळोदा तालुका अध्यक्षपदी भिका चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि जनहिताच्या कामांमध्ये सक्रिय असलेल्या चव्हाण यांच्या निवडीमुळे तळोदा तालुक्यात ग्राहक हक्कांच्या संरक्षणाला अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

            तळोदा येथील आर के मार्बल येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीला ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षा वंदना तोरवणे या उपस्थित होत्या. या बैठकीत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमताने भिका चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. चव्हाण यांच्या कार्याची दखल घेत आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. भिका चव्हाण यांच्या सामाजिक कार्यामधील दीर्घ अनुभव त्यांना ग्राहक हक्कांच्या लढाईत उपयोगी ठरेल व त्यांच्यामध्ये असलेल्या प्रभावी नेतृत्वामुळे ते तळोदा तालुक्यातील ग्राहक चळवळ अधिक शिक्षण करतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व उपस्थितांनी  चव्हाण यांचे अभिनंदन केले. आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तालुक्यातील ग्राहक चळवळीला यामुळे अधिक वेग येईल आणि ग्राहकांचे हित जपले जाईल अशी आशा यावेळी सर्वांनी व्यक्त केली. यावेळी भगवान माळी, विलास माळी, लक्ष्मण वाघ, दीपक कर्णकार, प्रकाश कर्णकार, रत्नजीत माळी, मोहन माळी, राम अवतार, भिका चव्हाण, भरत भामरे, चेतन इंगळे, कविता शर्मा, राजेंद्र पंजराळे यांसह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 


भिका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा तालुक्यात ग्राहक जनजागृतीची विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजन लवकरच केले जाईल तसेच ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विविध बैठकाचे देखील आयोजन करण्यात येईल यामध्ये परिसंवाद घेणे आणि आवश्यक तेथे कायदेशीर मदत पुरवणे यासारख्या बाबींच्या समावेश असेल.


ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकून ही जबाबदारी दिल्याबद्दल मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तळोदा तालुक्यातील ग्राहकांचे शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. 

     भिका चव्हाण

अखिल भारतीय ग्राहक पंचायत    तळोदा तालुका अध्यक्ष


      

आपण या पदावर राहून तळोदा  तालुक्यातील प्रत्येक ग्राहकाला त्याच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी कटिबद्ध राहाल व  ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून आणि त्यांच्या समस्येचे निवारण कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. 

    वंदना तोरवणे 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत          जिल्हाध्यक्षा

Post a Comment

0 Comments