Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त तळोद्यात रक्तदान शिबिर.. शिबिरात ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान. एम

 सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त तळोद्यात रक्तदान शिबिर..

 शिबिरात ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान...

तळोदा / सप्त नगरी न्युज नेटवर्क:

“रक्तदान हीच खरी ईश्वरसेवा” या विचाराने प्रेरित होऊन भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त तळोद्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाचे आयोजन समस्त गुर्जर समाज तळोदा तालुका व VSGGM यांच्या वतीने करण्यात आले होते.

तळोदा जय कुबेर ऍग्रो, येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात प्रमुख उपस्थित अजयभैय्या परदेशी, किरण भाऊ सूर्यवंशी, रूपसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्घाटन समस्त दोडे गुजर समाज अध्यक्ष  बापूभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत प्रवीणभाई पटेल (VSGGM ), डॉ.जयेशभाई पटेल सुरत, भरतभाई पाटील (पोलिस पाटील ,तळवा) , संजयभाई पटेल, महेंद्रभाई पटेल, कांतीलाल पाटील, सुभाषभाई पटेल, गणेशभाई पटेल, हरकलाल पाटील,  संजयभाई चौधरी,  भरत पटेल, संजय पटेल,  डॉ भूपेंद्रभाई पटेल,  विनोदभाई पाटील,  दिलीपभाई पटेल,  गोविंद पाटील,  संदीप भाई पटेल,  तेजसभाई सूर्यवंशी आदी उपस्थिती होते. 

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषणभाई पाटील, चंद्रकांतभाई पाटील,  मनिषभाई पटेल, सागरभाई पाटील, योगेशभाई पटेल, प्रदीपभाई पाटील,  मयूरभाई पटेल, आशुतोषभाई पटेल,  निखिलभाई पटेल, राहुलभाई पटेल,  शुभमभाई पटेल,  गणेशभाई पाटील, डॉ. भूषणभाई पटेल, रोशन पटेल,  रोहित पाटील  यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  हितेंद्र पाटील यांनी केले. शिरबिरात

रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. शिबिरात गुर्जर समाजाचे पदाधिकारी, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे सदस्य व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनापूर्वी आयोजित या उपक्रमातून तळोद्यात “सेवा, एकता आणि मानवता”चा सुंदर संगम पाहायला मिळाला. लोहपुरुषांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन या रक्तदान उपक्रमाने समाजात एकतेचा आणि राष्ट्रीय ऐक्याचा नवा संदेश दिला.

Post a Comment

0 Comments