तळोदा येथे सम्राट बळीराजा गौरव दिन साजरा
तळोदा : सम्राट बळीराजा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील समता, बंधुता व सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
सत्यशोधक समाज संघाच्या वतीने तळोदा येथे दरवर्षी बळीराजा गौरव दिवस साजरा करण्यात येतो. स्मारक चौकात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सत्यशोधक समाजाचे विश्वस्त डॉ. देविदास भगवान शेंडे, निसार दादा मकराणी, बालू राणे, मित्तलकुमार टवाळे, मुकेश कापुरे, महेश देवरे, मणीलाल कुंभार, एन.के. पिंपरे, निमेशदादा सूर्यवंशी, प्रा. सुदेश सूर्यवंशी, रत्नाकर शेंडे, राजेंद्र पाडवी, संदीप मुके, ताराताई मराठे, शिरीषकुमार (बब्बू) माळी, वतनकुमार मगरे, घनश्याम चौधरी, अतुल सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, लक्ष्मण चव्हाण, नारायण धोंडू शेंडे, सुभाष शेंडे, महेंद्र कर्णकार, डॉ. किशोर सामुद्रे, सतीश कर्णकार, मनोज कुंभार, हितेश कुंभार, राजेंद्र साळी, दिलीप सोनार, बन्सीलाल तांबोळी, सुनील पिंपळे, मधुकर लांबोळे, मोहन कर्णकार, संदीप वामन माळी, कुशल दामोदर सागर व रमेश कर्णकार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी वक्त्यांनी सम्राट बळीराजांच्या कार्यातून समता, न्याय आणि लोककल्याणाचा आदर्श आजच्या पिढीसमोर जिवंत ठेवण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश देत कार्यक्रमाचे औचित्य साधले.
कार्यक्रमात स्थानिक नागरिक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच युवकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होते.

Post a Comment
0 Comments