नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केले सुंदर ग्रिटिंग, कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांना दिल्या शुभेच्छा
नॅशनल हायस्कुलचा विद्यार्थ्यांचा उपक्रम
तळोदा:- दिवाळी सणाच्या निमित्ताने नॅशनल हायस्कूल, तळोदा येथे विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा आणि भावनिक उपक्रम राबविला. देशाच्या सिमेवर दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते सुंदर ग्रिटिंग कार्ड्स (शुभेच्छा पत्रे) तयार केली.
या उपक्रमाचा उद्देश सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे तसेच सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा होता. विद्यार्थ्यांनी प्रेम, सर्जनशीलता आणि देशभक्तीच्या भावनेने रंगीत कार्ड्स बनवून “आपण सर्व एक आहोत — आपला देश, आपली ताकद आहे!” असे प्रेरणादायी संदेश लिहिले.
या उपक्रमात मुख्याध्यापक एजाज कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शब्बीर मन्सूरी, जुबेर अन्सारी, इरफान शेख, नाजनीन पठाण, सय्यद खालिद, सय्यद इरफान, शेख मोहसीन, तौसिफ मन्यार, जुबेर लष्करी, अमीन खान आणि हमीद शेख यांनी परिश्रम घेतले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “अशा कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमासोबत मानवी मूल्ये आणि सर्वधर्मसमभावाची जाणीव दृढ होते. विविध धर्मांचे विद्यार्थी एकत्र येऊन केलेला हा उपक्रम खरी राष्ट्रीय एकात्मता दाखवतो.”
या उपक्रमात मारिया पिंजारी, आयेशा मन्यार, राहिला पिंजारी, समीरा अन्सारी, अफशा शेख, असबा पिंजारी, साजिया शेख, माहेनूर शेख, इलीयना मन्सूरी, फेमिना काझी, रुहीनाज शहा, उजेफ अन्सारी अक्सा शेख आदी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
नॅशनल हायस्कूलचा हा दिवाळी उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती, एकता आणि मानवी मूल्यांची ज्योत अधिक प्रखर झाली आहे.


Post a Comment
0 Comments