Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धुळे येथील सुरेश थोरात यांना राज्यस्तरीय “साहित्यरत्न” पुरस्काराने सन्मान

 धुळे येथील सुरेश थोरात यांना राज्यस्तरीय “साहित्यरत्न” पुरस्काराने सन्मान

                   धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले तसेच विविध सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे सुरेश थोरात यांना “राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2025” ने गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे “काव्यांगण साहित्य मंच” तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ व कविसंमेलन प्रसंगी प्रदान करण्यात आला.

                      या सोहळ्यात उमरगा शहराचे आमदार तथा उद्घाटक  प्रवीण स्वामी यांच्या हस्ते आणि संमेलनाध्यक्ष विजयकुमार कस्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत थोरात यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, मानवस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मंचाचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक विकास राठोड, प्रमुख अतिथी सुवर्णा पवार, कवयित्री अॅड. शुभदा पोतदार, डॉ. संजय राठोड आणि डॉ. डी. व्ही. खरात आदी मान्यवर उपस्थित होते.


सुरेश थोरात हे धुळे जिल्हा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे माजी उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी संघटनेचे माजी सचिव व विद्यमान सल्लागार आहेत. ते “भारतरत्न सर विश्वेश्वरय्या ज्येष्ठ नागरिक संघ” चे आजीव सदस्य असून कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था, धुळे चे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

थोरात यांनी गुणवंत कर्मचारी पुरस्कार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार, तसेच निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार असे अनेक सन्मान प्राप्त केले आहेत. ते साहित्य, कविता आणि लेखन क्षेत्रातही सक्रिय असून त्यांच्या लेखणीला सामाजिक भान आणि संवेदनशीलतेचा स्पर्श लाभलेला आहे.


या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. दुपारच्या सत्रात “काव्यांगण दीपोत्सव कविसंमेलन” चे आयोजन करण्यात आले होते, ज्यात राज्यभरातील कवी, साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थिती लावली.


थोरात यांच्या या सन्मानानंतर मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रादेशिक उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, रमाकांत थोरात, रतनकुमार थोरात, नितीन वाघ, सुरेश सोनार, डी. बी. सोनार, गणेश वाघ, डी. जी. मळेकर, डी. डी. उकिरडे, दिलीप बंड, राजेन्द्र माळी, अविनाश मोरे, सुधीर पोतदार, सुरेश बहाळकर,अतुल निकम, ललित कासार, आर. बी. सोनार, सुरेश पवार पाटील, जे. डी. सोलंकी, राजू रेंडे तसेच आप्तस्वकीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments