उजैन (मध्यप्रदेश ) महाकाल नगरी येथे श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान...!
नंदुरबार (प्रतिनिधी)- सोशल मिडीयाद्वारे रक्तदात्यांची साखळी निर्माण करुन रक्तदान या महान कार्यात पुढाकर घेणाऱ्या नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा 'उज्जयनी रक्त संचार संस्था' सेवा गृप उज्जैन तर्फे 'राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म. प्र. - 2025' ने सन्मानित करण्यात आला आहे.श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा हा 2025 चा 4था पुरस्कार आहे.
नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन या संस्थेने व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातुन अनेक रक्तदात्यांची साखळी तयार केली आहे. जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्यावर व गरजु रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी या फाऊंडेशनच्या माध्यमातुन आवाहन केल्यावर गरजुंना रक्तदान करण्यासाठी रक्तदाते धावुन येतात. यामुळे वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यावर रूग्णांना जीवदान मिळते. रक्तदान हे महान कार्य असून रक्तदानाची साखळी श्री छत्रपती ब्लड फाऊंडशनने सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जोडुन ठेवली आहे. म्हणुन या कार्याची दखल घेत मध्य प्रदेशातील उज्जैन येथील उज्जयनी रक्त संचार संस्था' उज्जैन मार्फत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म. प्र. - 2025 जाहीर केला. उज्जैन येथे झालेल्या कार्यक्रमात
श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचे सक्रिय सदस्य अरुण शांतीलाल साळुंखे व त्यांची पत्नी सौ. साधना अरुण साळुंखे यांनी हा पुरस्कार घेतला. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र तसेच पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार,झारखंड, राजस्थान, गुजरात,तेलंगणा, छत्तीसगढ अशा पुर्ण भारतमधून वेगवेगळ्या राज्यांतून 80 संस्थाच्या सम्मान झाला. याप्रसंगी माननीय उज्जैन चे सभापती कलावती यादव, नेता प्रतिपक्ष रवि राय, राज्य मंत्री व वक्फ बोर्ड चे अध्यक्ष सनवर पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादवचे मोठे भाऊ नारायण यादव पण उपस्थितीत होते.श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या चळवळीत महेंद्र झवर, जीवन माळी अजय देवरे, हितेश कासार, सुधीरकुमार ब्राम्हणे. पो.कॉ. अभय राजपूत आदींचे योगदान आहे.

Post a Comment
0 Comments