Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमसुशिलची विद्यार्थिनी रोशनी पाचोरे हिने प्रथम क्रमांक, नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड

 शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमसुशिलची विद्यार्थिनी रोशनी पाचोरे हिने प्रथम क्रमांक, नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड

       शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्ष मुली या गटात तळोदा येथील नेमसुशिल विद्यामंदिराची विद्यार्थिनी रोशनी हिरालाल पाचोरे हिने जिल्हास्तरावर गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाशिक विभाग स्तरासाठी तिची निवड करण्यात आली. 

शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्ष मुली या गटात नेमसुशिल विद्यामंदिरची  विद्यार्थिनी रोशनी हिरालाल पाचोरे या विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाशिक विभाग स्तरासाठी तिची निवड करण्यात आली. तसेच राधेय प्रविण रामोळे या विद्यार्थ्याने उंचउडी स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळविला. 

        या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक सी. जी. वळवी,  योगेश पाडवी  तसेच श्रीमती जिजा पराडके यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष  निखीलभाई तुरखीया, संचालिका सौ. सोनाबेन तुरखीया, उपाध्यक्ष  दगेसिंग महाले, सचिव  संजयभाई पटेल, व संस्था समन्वयक हर्षिल भाई तुरखीया, प्राचार्य  सुनील परदेशी तसेच मुख्याध्यापिका श्रीमती भावना डोंगरे यांनी सदर विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments