तळोदा येथील एस .ए .मिशन इंग्लिश मीडियम स्कूल गांधी व शास्त्री जयंती साजरा
तळोदा येथील एस .ए .मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते. यावेळी प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित प्रसंगाचे मनोगत व्यक्त केले तर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी गांधी जयंती निमित्त निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला.
याप्रसंगी मुख्याध्यापक नाईक यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या आयुष्यात साधी राहणी व उच्च विचारसरणी कशा पद्धतीने अवलंबली हे उदाहरण दाखल स्पष्ट केले व आज आपल्या देशाला अशा महान नेत्यांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले.
मुख्याध्यापक नाईक यांनी स्वच्छता रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. स्वच्छता रॅलीत विद्यार्थ्यांनी शाळेच्या अवतीभवतीच्या परिसर व कॉलनी भागात जाऊन स्वच्छता केली व स्वच्छतेवर घोषणा देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता पाडवी व आभार प्रदर्शन किरण मगरे यांनी मांडले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments