दिमाखदार सोहळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 20 कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण.....
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ७५ व्या स्थापना दिनानिमित्त (अमृत महोत्सव) सुमारे २० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण आणि भव्य शेतकरी मेळावा, बचत गटातील महिलांच्या सन्मान, उत्कृष्ट शेतकरी सन्मान आदी कार्यक्रम बाजार समितीच्या प्रांगणात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारभाऊ रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राम भदाणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल, शहाद्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष वनश्री मोतीलाल तात्या पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, बाजार समितीचे सभापती अभिजीत द पाटील, उपसभापती भानुदास पाटील,
बाजार समितीचे संचालक मंडळ, माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मुशीर, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, नंदुरबार जिल्हा केळी व पपई बागायतदार संस्थेचे अध्यक्ष बुधाभाई पाटील, उपाध्यक्ष राहुल सनेर, सचिव हरी पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड .स्वर्णसिंग गिरासे,
धडगाव बाजार समितीचे सभापती जामसिंग पराडके, विभागीय पणन अधिकारी एस. वाय. पुरी, सहाय्यक निबंधक गिरीश महाले, सेवानिवृत्त कृषी संचालक कैलास मोते आदींसह विविध संस्थांचे, पक्षाचे पदाधिकारी यांचा उपस्थितीत संपन्न झाला.
20 कोटींची कामे अशी......
कोणाकडूनही कर्ज न घेता शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने सुमारे 20 कोटी रुपयांचे विकास कामे केली. त्यात बाजार समितीतील २ कोटी १९ लाख रुपयांचे काँक्रिटीकरण लोकार्पण, २ कोटी ५१ लाखांचे पार्किंग शेड लोकार्पण, २ कोटी १७ लाख रुपयांचे २२ व्यावसायिक दुकानांचे भूमिपूजन,४ कोटी २४ रुपयांचे २१ गोदाम बांधकामांची भूमिपूजन, ५६ लाखांचे प्रवेशद्वार बांधकाम भूमिपूजन, सात कोटी ७२ लाख रुपयांचे अंतर्गत रस्ता व ऑक्शन प्लॅटफॉर्म बांधणे.,५० लाखांचे विद्युतीकरण, ५०लाखांचे बागायतदार भवन असा एकूण २० कोटी ५० लाख रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उत्कृष्ट शेतकऱ्यांच्या सन्मान....
यावेळी या कार्यक्रमात मंत्री ना.जयकुमारभाऊ रावल व मान्यवरांच्या हस्ते जीवनधारा महिला शेतकरी गट (मानमोडे), रोशन अशोक पाटील (ब्राह्मणपुरी), मनोज शांताराम पाटील (कोठली), विकास भरत चौधरी (म्हसावद), वैभव राजेंद्र पाटील (मा.मोहिदा) आदी शेतकऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
उत्कृष्ट महिला बचत गटांच्या सन्मान...
यावेळी नारीशक्ती उत्पादक गट (गणोर), उमेद स्वयंसहायता समूह (लांबोळा), गुरु प्रेरणा महिला बचत गट (शहादा), श्रीदत्त महिला बचत गट (कलमाडी), श्री चक्रधर स्वयंसहायता समूह (लोणखेडा) आदी बचत गटांनी विविध प्रक्रिया उद्योग स्थापन करून स्वतः रोजगाराची साधने उपलब्ध करून घेतल्याने मंत्री ना.जयकुमार भाऊ रावल व मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या गौरव करण्यात आला. यावेळी बचत गटाचे अधिकारी हर्षल पाटील, योगेश पाटील, गुणवंत पाटील आदी उपस्थित होते.
सोहळ्याला परिसरातील नागरिक, महिला ,शेतकरी उपस्थित होते







Post a Comment
0 Comments