Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धनपूर गाव भेटीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी IFR सर्वे व वनहक्क कामांचा घेतला आढावा...

 धनपूर गाव भेटीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी IFR सर्वे व वनहक्क कामांचा घेतला आढावा...

      नंदुरबार :  दि.29 रोजी तळोदा तालुक्यातील धनपूर गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नुकतीच भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. IFR Application सर्वेक्षण व वनहक्काच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही भेट घेण्यात आली.

   या वेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, सीएम फेलो अभिनव कोल्हे, एबीएफ क्षितिजा देशमुख, विशाल बेद्रे, IFR Development टीम सदस्य, ग्रामसेवक, सरपंच, गावकरी तसेच PESA Mobilizer उपस्थित होते.

गावातील उपलब्ध सुविधांबाबत गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की –

ANM नियमित भेट देतात.

सार्वजनिक वाचनालयाची सोय आहे.

चारही अंगणवाड्यांमध्ये रोज पोषण आहार मिळतो.

जिल्हा परिषदेच्या शाळेत 150 हून अधिक विद्यार्थी उपस्थित असतात.

महत्त्वाच्या ठिकाणी कचरा कुंडी उपलब्ध आहे, आणखी अपेक्षा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी गावाच्या विकासासाठी काही सूचना दिल्या :

गावातील खड्डे भरल्यानंतर पुन्हा भेट घेऊन प्रत्यक्ष तपासणी केली जाईल.


स्थलांतर टाळण्यासाठी मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावीत.

IFR Application मध्ये प्रश्नोत्तरावेळी व्हॉईस मेसेज/रेकॉर्डिंगची सुविधा असावी.

IFR Application मध्ये आणखी 2–3 योजना समाविष्ट कराव्यात.

ग्रामस्थांच्या मागण्या

गावकऱ्यांनी CFR जमीन मिळावी, दररोज एस.टी. बसची सोय व्हावी, सौर पंप मिळावा तसेच महसूल क्षेत्रातील रस्त्याची मागणी केली.

IFR Application सर्वेक्षण

या भेटीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वतः फील्डवर जाऊन IFR Application अंतर्गत सर्वेक्षण केले. त्याचबरोबर वनहक्काच्या कामाचा आढावा घेतला.

निष्कर्ष

धनपूर गावातील पाहणी दरम्यान गावकऱ्यांच्या समस्या व मागण्या थेट ऐकून जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा विश्वास दिला.

.

.

.

#Nandurbar #Taloda #Dhanpur #GramVikas #IFRSurvey #VanHakka #STBus #SolarPump #MahatmaGandhiNREGA #HealthServices #Education #CollectorNandurbar #DrMitaliSethi #NandurbarDevelopment #DistrictAdministration

Post a Comment

0 Comments