Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घरकुल २०२४-२५ व त्यानंतरचे पूर्ण झालेले घरकुलांना वाढीव अनुदान मिळावे मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष नितेश पाडवी व पदाधिकारी व लाभार्थ्यांचे बिडीयो यांना निवेदन

 घरकुल २०२४-२५ व त्यानंतरचे पूर्ण झालेले घरकुलांना वाढीव अनुदान मिळावे मागणी

भाजपाचे तालुकाध्यक्ष नितेश पाडवी व पदाधिकारी व लाभार्थ्यांचे बिडीयो यांना निवेदन


                  अक्कलकुवा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत २०२४-२५  व त्यानंतरचे घरकुल पूर्ण झाले असेल तरी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात ५० हजार वाढीव  अनुदान देण्याचे त्वरित वितरीत करण्यात यावा अशी मागणी अक्कलकुवा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष नितेश पाडवी  यांच्यासह लाभार्थ्यांनी निवेदनात केली आहे.


याबाबत अक्कलकुवा पं. स. गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यात म्हंटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी उक्त शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ पासुन रक्कम रु ५०,०००/- एवढी वाढ करण्यात आली असुन सदर रकमेतून रक्कम रु ३५,०००/- अनुदान है घरकुल बांधकामासाठी व रक्कम रु १५०००/-इतके अनुदान हे प्रधानमंत्री सुर्यधर योजनेतुन छतावर KW मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करीता देण्यात येणार आहे.


शासन निर्णयात स्पष्ट नमुद केले असतांना देखील, तालुकास्तरावरील आढावा बैठकीमध्ये असे निदर्शनास आले आहे की वाढीव अनुदानाची रक्कम घरकुल पुर्ण झाल्यावर मिळणार नसल्याबाबत लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्मान होत असल्याने लाभार्थी घरकुल बांधकाम पूर्ण करीत नाहीत. याबात शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम हे पुर्ण जरी झाले असले तरी देखील सन २०२४-२५ व त्यानंतरच्या घरकुलांना आवास सॉफ्टवर वाढीव अनुदानाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. सदर बाब ग्रामपंचायत अधिकारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचेमार्फत लाभार्थ्यांच्या निदर्शनास आणुन यावी व घरकुलाचे बांधकाम प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. तरी मोहदय गट विकास अधिकारी साहेबानी पाच ते सात दिवसाचा आत सर्व ग्राम. पंचायतींना सूचना देवून ग्राम विकास अधिकारी व गृह निर्माण अभियंता यांना सूचना देवून तत्काळ वाढीव रक्कम ५०,००० रु लाभार्त्याचा खात्यावर लवकरात लवकर वितरीत करण्यात यावे. अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष नितेश पाडवी,सरचिटणीस सागर गावित, वतन पाडवी, चिटणीस प्रेम वळवी, भाजपा एस टी मोर्चा अध्यक्ष योगेश पाडवी, अशोक नाईक, विशाल वळवी, आनंद वसावे, रोहित वळवी, अजय पवार, विकास वसावे,सुकलाल वळवी, सुनील वळवीआदीसह भाजपा पदाधिकारी व लाभार्थ्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments