Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

 तळोदा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

        तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर  महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा आयोजित पंतप्रधान उच्चत्तर शिक्षा अभियान अंतर्गत विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा विकसित भारत निर्माण करण्यासाठी कौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, जीवनशिक्षण, कौशल्य विकास या विषयावर  कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला 220 विद्यार्थी सहभागी झाले होते. 


            कार्यक्रमाचे अतिथी जळगांव उमवि व्यवस्थापन माजी सदस्य डी. आर. पाटील, यांनी कार्यशाळेचे उदघाटन केले. विद्यार्थ्यांना सर्वांगीण नेतृत्व कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा एन. डी. पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विद्यापीठ विकास मंच, महाराष्ट्र राज्य, यांनी कार्य नितीमुल्ये  या विषयावर मार्गदर्शन केले. आप की जय वैचारिक चळवळीचे कार्यवाहक जितेंद्र चंद्रसेनजी पाडवी रंजनपूर मोरवड, यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना येणाऱ्या सामाजिक, वैवाहिक जीवनातील समस्या आणि निवारण या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. सुभाष पाटील यांनी वेळेचे महत्व आणि परिणामकारक संभाषण या विषयावर मार्गदर्शन कले. प्रा. भरत सोनार एच. आर .पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय, शिरपूर, यांनी परस्पर संबंध, विशेषणात्मक कौशल्य या विषयावर मार्गदर्शन कले. रजनीश ब्रम्हभट आर्ट ऑफ लिव्हिंग शिरपूर यांनी युवा शक्ती या विषयावर मार्गदर्शन केले. अतिथी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करावे असे प्रतिपादन केले,

        कार्यक्रमाला अध्यापक शिक्षण मंडळ संचलित कला वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित माळी, कोषाध्यक्ष लक्ष्मण माळी, सहसचिव अरविंद माळी,  महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव डॉ. एच. एस. दलाल कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. साहेबराव चव्हाण, सह समन्वयक डॉ. एस. आर. गोसावी, डॉ. एस. एन. शर्मा, सह समन्वयक डाॅ. आर. झेड. यशोद  अंतर्गत गुणवत्ता सुधार समिती प्रमुख डॉ. रमेश राजानी, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.पराग तट्टे, प्रा.पंकज सोनवणे, प्रा.ललित पाटील, डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. मुकेश जावरे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. स्वप्निल वाणी, डॉ.हेमकांत सावंत कार्यालयीन अधिक्षक मनीष कलाल, कार्यालयीन लिपिक संतोष केदार, शिक्षकेत्तर बंधू रविंद्र पाडवी, जयेश बच्छाव, शिवदास प्रधान यांचे सहकार्य लाभले. 

            कार्यशाळेचे सुत्रसंचालन राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. राजू यशोद केले. आभार प्रदर्शन कार्यशाळा समनव्यक डॉ. एस. आर. चव्हाण यांना केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments