अक्कलकुवा येथील जन आक्रोश आंदोलनाच्या पार्श्भूमीवर भाजपा कार्यालयात नियोजन बैठक संपन्न
अक्कलकुवा भाजपा च्यावतीने तहसिल कार्यालयासमोर बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताचा तातडीने पुरवठा करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी जन आक्रोश आंदोलन आयोजीत करण्यात आले असुन,त्या संदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजन बैठक अक्कलकुवा येथील कुबेर पार्क मधील भाजपा कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती.
या बैठकीला अक्कलकुवा विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेश पाडवी,माजी जिल्हा परिषद सदस्य किरेसिग वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी नियोजन बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेशकुमार पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे,
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य नटवर पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, माजी पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी, माजी सरपंच जगदिश वसावे, माजी सरपंच दिलीप वसावे, सरपंच नरेश पाडवी, माजी सरपंच किसन नाईक, अँड रूपसिंग वसावे, सुरेश वसावे,ईश्वर वसावे, गोविंद वळवी, हेमराज वळवी, योगेश वसावे, दिलीप तडवी,भुषण पाडवी, वैभव पाडवी, अविनाश पाडवी,अमृत चौधरी, महेश तवर, विनोद कामे बैठकीला उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments