शेजवा शाळेत साक्षरता सप्ताह उत्साहात साजरा
नंदुरबार विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत साक्षरता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 ते 8 सप्टेंबर2025 पर्यंत साक्षरता सप्ताह मध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात उल्हास नवभारत साक्षरता प्रचार प्रसार, स्थानिक संस्थांच्या ग्रामपंचायत मध्ये बैठका, माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींची संपूर्ण शेजवा गावातून साक्षरता रॅली काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी साक्षरतेवर आधारित विविध अशा घोषणा दिल्या. शेजवा गावात साक्षरतेवर आधारित विजय पवार लिखित पथनाट्य सादर करण्यात आले सदरील पथनाट्यामध्ये शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार, कलाशिक्षक आनंदराव पवार, उपशिक्षक हरून खा शिखलीगर, रामानंद बागले, संजय बोरसे श्रीमती संगीता गोखले, संदीप गायकवाड यादीने भाग घेतला,
भित्तिचित्राद्वारे नवभारत साक्षरता विषयी जनजागृती करण्यात आली, शाळेमध्ये सर्वांसाठी शिक्षण या विषयावर वादीवाद स्पर्धा घेण्यात आल्या सदरील वादीवाद स्पर्धेमध्ये इ.10 वी चे विद्यार्थी शितल नाईक व अभिनव वळवी यांनी सहभाग घेतला सदरील वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी केले.
साप्ताहच्या शेवटच्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नव साक्षर यांचा मान सन्मान करण्यात आला. अध्यक्ष भाषणातून पाटील यांनी इयत्ता 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना गावोगावात नव साक्षरता वर्ग सुरू करून असाक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान केले. सदरील साप्ताह यशस्वी करण्यासाठी शाळेचे उपशिक्षक विजय पवार दीपक वळवी, रामानंद बागले, हारून खा शिखलीगर, संजय बोरसे, आनंदराव पवार, संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे, दिनेश पवार, समीर वसावे यादीने परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments