खर्डी खुर्द येथे जि.प. प्रतापपूर केंद्राची शैक्षणिक परिषद संपन्न
तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डी खुर्द येथे खर्डी खुर्द, बंधारा,गाढवली, अलवान या शाळांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक रुपी पुष्प तिसरे गुंफण्यात आले. शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रतापपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती रंजना निकुंभे ह्या होत्या.
या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून खर्डी खुर्द गावाचे सरपंच मालतीताई मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरिता मोरे खर्डी खुर्द, देवीसिंग पवार अलवान, नितीन ठाकरे बंधारा, शिक्षण प्रेमी कोमा पाडवी, सदस्य, शिक्षक वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
कार्यक्रम सावित्रीबाई फुले, सरस्वती माता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन शिक्षण परिषदेचे उद्घाटन ईशस्तवन व स्वागत गीत जल्लोषात करण्यात आले . सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक करून केंद्रप्रमुख च्या हस्ते बक्षीस देण्यात आले .
मागील परिषदेचा आढावा, गुणवत्तेबाबतचा आढावा, केंद्र आधारित शैक्षणिक गरजा, चर्चा, नियोजन,अंमलबजावणी, शंका व प्रश्नांचे निरसन या बाबत केंद्रप्रमुख श्रीमती रंजना निकुंभे यांनी मार्गदर्शन केले . अध्ययन निष्पत्ती वर आधारित आदर्श पाठाचे गणित विषयाचे सादरीकरण मनीषा गोसावी,दयाराम वसावे यांनी केले.
कर्मयोगी भारत पोर्टल ॲपवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत मनीषा ठाकूर व नंदकुमार शेंद्रे यांनी मार्गदर्शन केले .पालक परिषद व शैक्षणिक ग्रामसभा प्रक्रिया या विषयाची माहिती भिमसिंग वळवी यांनी दिली . अध्ययन निष्पत्तीवर आधारित माझ्या वर्ग माझे नियोजन माहिती देऊन गटकार्य करुन सादरीकरण संजय पवार,दशरथ पटले यांनी करून घेतले .
या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन भास्कर वेंदे अनुमोदन जितेंद्र कोळी तर उपस्थितांचे आभार देवेंद्र भामरे यांनी मानले. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी किशोर भारती, उषा वळवी यांनी अथक परिश्रम घेतले . अशा प्रकारे शिक्षण रुपी पुष्पाचे गुंफण करण्यात आले .






Post a Comment
0 Comments