जनसुरक्षा कायदा हा जनविरोधी व घटना विरोधी त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी
तळोदा शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन
तळोदा, ता. १० /सप्त नगरी न्युज
महाराष्ट्र सरकारने नुकताच जनसुरक्षा कायदा निर्माण केला आहे. मात्र हा कायदा जनविरोधी व घटना विरोधी आहे. त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून तळोद्याचे तहसीलदार दीपक धिवरे यांना देण्यात आले आहे.
या बाबत शिवसेना उबाठा पक्षातर्फे निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासना मार्फत नवीन जनसुरक्षा कायदा निर्माण करण्यात आलेला आहे. हा कायदा जनविरोधी व घटना विरोधी असून लोकशाहीतील सामान्य जनतेचे हक्क नाकारणारा व सामान्य जनतेच्या हक्कावर गदा आणणारा आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश असून संविधानाने भारतीय नागरिकांस जे हक्काने जगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, त्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे. या कायाद्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही निर्माण करत आहे. त्यामुळे हा कायदा महाराष्ट्र शासनाने त्वरित रद्द करावा. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मार्फत मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विपुल कुलकर्णी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाथा पावरा, शिवसेनेचे शहरप्रमुख देवा कलाल, युवासेनेचे शहरप्रमुख तुषार भांडारकर, युवासेनेचे उप शहरप्रमुख हर्षल चौधरी, भूषण सोनार, इमरान शेख, जितू गुरव, बापू कलाल, प्रशांत ठाकरे, राहुल पावरा, धीरेंद्र पाडवी, जंगलसिंग पाडवी आदींचा स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments