तळोदा तालुकास्तरीय उल्लास नवभारत साक्षरता अभियानात प्रशिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण
तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक सहा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व समग्र शिक्षा तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हास नव भारत साक्षरता अभियान अंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव तसेच तालुक्यातील केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी तळोदा, सोमावल, योगेश शिंपी राजविहीर, जगन्नाथ मराठे मोदलपाडा, दशरथ वायकर बोरद, धनंजय जाधव तळवे, युवराज मराठे मोड, रंजना निकुंभे प्रतापपूर, सुकलाल पावरा चिनोदा उपस्थित होते .
परिपाठानंतर गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ओळख . " गार गार वारा आला " ही गाणी सादर केल्यानंतर विनोद सैंदाणे यांनी स्वंय सेवकाची भूमिका व साक्षरता वर्गाची माहीती दिली. ॲप, लिंक वापरतांना घ्यावयाची काळजी, साक्षरता व आर्थिक साक्षरता समृद्धी यातील संबंध ? या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणली. स्वंयसेवकांना प्रशिक्षण कसे द्यायचे आहे. नवसाक्षरांना शिकवण्याचे नियोजन कसे करावे ? गावपातळीवर साक्षर करण्याचे नियोजन कसे करावे ? याबाबत माहीती दिली .
उल्लास ही संकल्पना सन २०२२--- २०२७ पर्यंत चालणार आहे. हा केंदशासनाचा उपक्रम आहे. हे राष्ट्रीय कार्य आहे १५ वर्षावरील सर्व नवसाक्षरांना साक्षर करायचे आहे. अशी माहिती विनोद सुर्यवंशी यांनी दिली.
अध्ययन अध्यापन सहित्य उजास प्रवेशिका, स्वंयसेवक मगदर्शिका, कृतिपत्रिका, चला जाऊ गोष्टींच्या गावा, मूल्यमापन पत्रिका, प्रश्नपत्रिका, प्रश्नपेढी, नवसाक्षरांचा आदर करावा. मन दुखवेल असे बोलू नये. त्यांचे दुःख समजून घ्यावे. शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. भाषा गणित विषयाचे ज्ञान कसे द्यावे." सामाजिक चेतना बोर्ड" प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाने दर्शनी भागात लावावे. याबद्दल सविस्तर माहिती गणेश पाटील यांनी दिली . मूल्यमापन परिक्षा व सरावाची माहिती रुपाली पाटील यांनी दिली . केंद्र व शाळास्तरीय प्रशिक्षण नियोजन बाबत मार्गदर्शन वसंत जाधव यांनी केले .
या प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन विनोद सैंदाणे यांनी केले. प्रशिक्षणाच्या समारोपात दिपक पानपाटील यांनी झालेल्या विषयांची थोडक्यात माहीती सांगून अधिकारी वर्ग, तज्ञ मार्गदर्शक व उपस्थितांचे आभार मानून प्रशिक्षणाची सांगता आनंदाने केली.


Post a Comment
0 Comments