Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू प्रणव गावितचा गौरवशाली सत्कार

 जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू प्रणव गावितचा गौरवशाली सत्कार

       नंदुरबार शहरातील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एक विशेष सोहळा पार पडला. नुकताच होहहॉट, चीन येथे 13 व 14 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून परतलेल्या खेळाडू प्रणव गावित याचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आला.

      या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, क्रीडा अधिकारी ओंकार जाधव, संजय बेलोरकर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष इसरार सय्यद, सदस्य राजेश्वर चौधरी, श्रॉफ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील, कपूरचंद मराठे, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल पराग पोळ, प्रायमरी प्रिन्सिपल संदेश यंगड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा कालू, उपसंपादक रमाकांत पाटील, लायन्स क्लबच्या अध्यक्षा बोरसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की – “खेळाडू घडवण्यासाठी जिल्ह्यात अजून सुविधा उपलब्ध व्हाव्यात. कमी साधनांमध्ये मेहनत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे अत्यंत कठीण आहे, परंतु प्रणव गावितने दाखवलेली जिद्द आणि मेहनत प्रेरणादायी आहे. खेळाडूंसाठी जिल्ह्यात सर्वांगीण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. त्याकरिता एक ‘स्पोर्ट्स सपोर्ट टीम’ उभारण्यात येईल व त्याचे नेतृत्व स्वतः प्रणव गावितकडे सोपवले जाईल. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात येईल.”

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू प्रणव गावित व प्रशिक्षक खुशाल शर्मा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


हा सोहळा केवळ एका खेळाडूचा गौरव नसून संपूर्ण जिल्ह्यातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणारा ठरला.

.

.

.

#नंदुरबार #डॉमित्तालीसेठी #जिल्हाधिकारीनंदुरबार #प्रणवगावित #आंतरराष्ट्रीयखेळाडू #रग्बी #क्रीडाविकास #युवाप्रेरणा #SportsDevelopment #RugbyIndia #InternationalPlayer #PranavGavit #NandurbarUpdates #CollectorNandurbar #Inspiration

Post a Comment

0 Comments