नेमसुशिल विद्यामंदिरातील उपशिक्षक सचिन पंचभाई यांना शिक्षक ध्येय राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर
शिक्षक ध्येय मासिकतर्फे राज्यभरातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील एकूण 40 शिक्षकांची निवड करण्यात आली. यात नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर तळोदा येथील उपशिक्षक सचिनकुमार जगदीशभाई पंचभाई यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सचिन पंचभाई यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड कशी निर्माण करता येईल यावर नवोपक्रम सादर केला होता. त्यांच्या नवोपक्रमास राज्यस्तरावर गौरविण्यात आले. त्यांना प्राचार्य सुनिल परदेशी, मुख्याध्यापिका श्रीमती भावना डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सचिन पंचभाई यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखीलभाई तुरखीया, संचालिका सौ. सोनाबेन तुरखीया, उपाध्यक्ष दगेसिंग महाले, सचिव संजयभाई पटेल, व संस्था समन्वयक हर्षिल भाई तुरखीया यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments