पाणंद रस्ता पार्श्वभूमीवर तळवे ग्राम पंचायती विशेष ग्रामसभा संपन्न
तळोदा / सप्त नगरी न्युज
पांदन रस्ते बाबत विशेष मोहीम राबवणे(शेत रस्ते) साठी ग्रामपंचायत तळवे ग्राम पंचायतीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पाणंद रस्ता संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या ग्रामसभेत तहसीलदार दिपक धिवरे व सहाय्यक गटविकास अधिकारी पवार आणि विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे तसेच तलाठी राहुल कोकणी, कोतवाल विलास पाडवी तसेच सरपंच मोग्या भिल, उपसरपंच सौ.आशाबाई शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, दिपक ठाकरे, सतिश साळुंखे, नवनाथ ठाकरे, सविताबाई ठाकरे, वर्षा पडवी, रमिला ठाकरे, सुनंदाबाई केदार व ग्रामपंचायत केंद्र चालक विलास पाडवी लिपिक राजेश बारीकराव, ग्रा.पं.शिपाई अनिल मराठे दशरथ ठाकरे पोलीस पाटील भरतभाई पाटील तसेच
आरोग्य कर्मचारी सतिश जाधव सौ.रंजीता पाडवी, आशा वर्कर आक्काबाई केदार, पुष्पा पाटील, अंगणवाडी सेविका सीमा ठाकरे, मनिषा ठाकरे, सिमाबाई ठाकरे, गावातील शेतकरी विजय पाटील, विनायक,पाटील,मुन्ना पाटील, गोपाळ पाटील,अजय पाडवी, योगेश पाटील, गणेश पाटील, शंकर वसावे, भिका मराठे, राजू माळी, हरिभाऊ गागरे, संजय ठाकरे, भामट्या न्हाये, योगेश ठाकरे, लिंबा गायकवाड, पुष्पेंद्र गायकवाड तसेच ग्रामस्थ शेतकरी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी तहसीलदार धिवरे यांनी पांदन रस्ते बाबत विशेष मोहीम राबवणे(शेत रस्ते) साठी मार्गदर्शन केले. व सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रत्येक शेतकरी बांधवांना ग्रामपंचायत कडून तहसीलदार यांच्या हस्ते वृक्ष रोप वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येकाने आपल्या शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करावी. असे आवाहन केले.




Post a Comment
0 Comments