Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नेमसुशिल विद्यामंदिरात विद्यार्थ्यांमार्फत शिक्षक दिन साजरा विद्यार्थ्यांनी बजावल्या शिक्षकांच्या भूमिका, शाळेचे पाहिले कामकाज

नेमसुशिल विद्यामंदिरात विद्यार्थ्यांमार्फत शिक्षक दिन साजरा

विद्यार्थ्यांनी बजावल्या शिक्षकांच्या भूमिका, शाळेचे पाहिले कामकाज 

                   भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून विद्यामंदिरातील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थिनींनी शिक्षक म्हणून शाळेचे कामकाज पाहिले व शिक्षक दिन साजरा केला.

 
                  यात कुमारी निवेदिता गुरव मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. तसेच वैष्णवी वानखेडे, दिक्षिता पाटील, इशिका पाटील, दिव्यानी  सूर्यवंशी, कल्याणी केदार, सेजल पावरा, वैष्णवी पटेल, तितीक्षा गाढे, चेतना पटेल, प्रांजल कलाल, नायरा सूर्यवंशी, आणि दुर्गा पाठक यांनी उपशिक्षक म्हणून काम पाहिले. 

               कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका निवेदिता गुरव यांनी अध्यक्षस्थान भूषविले तसेच वैभवी व्हरगळ आणि तन्वी  पाटील यां विद्यार्थीनीनी आपल्या मनोगतातून शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. विद्यामंदिराचे ज्येष्ठ शिक्षक श्री बैसाने सर, श्री रविंद्र गुरव सर मुख्याध्यापक श्री. सुनील परदेशी यांनी आपल्या मार्गदर्शनातून या दिवसाचे महत्त्व पटवून दिले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक निवेदिता गुरव यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी वानखेडे व दिक्षिता पाटील यांनी केले.  संस्थेचे अध्यक्ष श्री निखीलभाई तुरखीया, संचालिका सौ. सोनाबेन तुरखीया, उपाध्यक्ष श्री दगेसिंग महाले, सचिव श्री संजयभाई पटेल, व संस्था समन्वयक चि. हर्षिल भाई तुरखीया यांनी सदर कार्यक्रमाचे कौतुकास्पद अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments