कैलास लोहार यांचे भारुडातून नवसाक्षर योजना साठी समाज प्रबोधन.
तळोदा येथे चाणक्यपुरी व परिसर गणेश मित्र मंडळ मार्फत आयोजित साई प्रसाद वारकरी भजनी मंडळ भजन संध्या कार्यक्रमात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक जिल्हा परिषद शाळा आष्टे शाळेचे मुख्याध्यापक तथा खानदेशातील सुप्रसिद्ध भारुडकार यांनी भारूडातून गणेश मंडळ भक्तांसाठी समाज प्रबोधन केले.
यात व्यसनमुक्ती,कुटुंबकल्याण,आई वडील सांभाळ,भ्रूणहत्या, अंधश्रद्धा,बेटीबचाव बेटी पढाव ,निर्मल ग्राम योजना व सध्या सुरू असलेल्या नवसाक्षर योजना साठी असाक्षर व्यक्तींना शिक्षणाचे आवाहन केले.अशिक्षित स्त्रीची संसारात कशी फजिती होते व एक शिकलेली आई तिची कशी प्रगती होते. याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कैलास लोहार हे गेल्या 30 वर्ष पासून भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आहे.वासुदेव,गोंधळी, वेडी, स्री पात्र असे अनेक वेशभूषा करून समाज प्रबोधन करत असतात.त्यांची वासुदेव व गोंधळी मतदार जनजागृती राज्य स्तरावर दखल घेण्यात येवून अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचे गणेश उत्सवात नवसाक्षर योजना साठी समाज प्रबोधन प्रभावी ठरत आहे व त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक करत आहे.यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक रोकडे, शिक्षणाधिकारी योजना पारधी, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव,केंद्रप्रमुख युवराज मराठे, जगन्नाथ मराठे यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment
0 Comments