खांडबारा पी यू अंतर्गत मळवण गावात लुपिन फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह
गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांसाठी पोषक आहार मार्गदर्शनासह राजगिरा लाडू व चिक्कीचे वाटप
नवापूर तालुक्यातील मळवण गावातील लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशन अंतर्गत बेटर कॉटन प्रकल्पातर्फे १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.मातामुलांचे आरोग्य सुधारावे, पोषणपातळी उंचवावी आणि समाजात पोषक आहाराबाबत जागरूकता वाढावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील, प्रकल्प समन्वयक चंदन टोक्षा, जेंडर लीड श्रीमती मोहिनी पाटील तसेच पी. यू. व्यवस्थापक सुरेश चौरे यांनी केले. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमात महिला व आशावर्कर, अंगणवाडी सेविका, परिचारिका जेंडर लीड सुमा पाडवी, कृषी मित्र सारा गावित , उपस्थित मातांना व महिलांना मार्गदर्शन केले.
गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी अडचणी, संतुलित आहाराचे महत्त्व, गर्भारपणातील पोषण, स्तनपानाची गरज आणि लहान मुलांच्या विकासासाठी आवश्यक अन्नघटक याबाबत परिचारिका आशा गावीत यांच्या द्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. संतुलित आहार न मिळाल्यास होणारे दुष्परिणाम आणि स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या पोषक आहाराचा वापर कसा करावा, हेही स्पष्ट करण्यात आले.
लुपिन फाऊंडेशनतर्फे या प्रसंगी गरोदर माता, स्तनदा माता अंगणवाडीतील मुले- मुली व गावातील किशोवयीन मुलींना राजगिरा लाडूचे पाकिट व चिक्की मोफत वाटप करण्यात आले.व पोषक आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात महिलांनी व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पोषण सप्ताह यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका , आशावर्कर, उपसरपंच, ग्रामपंचायत मोबिलीझर, जेंडर सदस्य ,परिचारिका व खांडबारा पी.यु. च्या सर्व कृषी मित्रांनी परिश्रम घेतले व शेवटी जेंडर लिड श्रीमती. सूमा पाडवी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाद्वारे ग्रामस्तरीय समाजाला पोषण शिक्षण देण्याचे काम केल्याने महिलांमध्ये व मातामुलांमध्ये जागरूकता वाढून त्याचा फायदा दीर्घकाळ समाजाच्या आरोग्य व्यवस्थेला होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.



Post a Comment
0 Comments