Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा.येथील श्रीमोती विद्यामंदिराचे शिक्षक सचिन पाटील यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!

 तळोदा.येथील श्रीमोती विद्यामंदिराचे शिक्षक सचिन पाटील यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!

          साईनगरी शिर्डी येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार - २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात राज्यातील अनेक गुणी व कार्यक्षम शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

                  शिक्षक हेच समाजाची आदर्श पिढी घडवणारे शिल्पकार असून, त्यांच्याच कार्याचा सन्मान करण्याच्या हेतूने फाउंडेशन तर्फे  या पुरस्काराचे आयोजन केले होते. यावर्षी हा मानाचा सोहळा शिर्डीत पार पडला.

              कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलराव जपे, डॉ. सुयज विखे पाटील, स्वरूप कापे, निखिल वामन व दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे व विश्वस्त अभिषेक तुपे यांनीही आपली उपस्थितीत होते.

        यावेळी  सचिन पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि अनेक आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत असून, या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला अधिक प्रेरणादायी अधिष्ठान मिळाले आहे.

सदरील पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखिया, संचालिका सौ सोनाभाभी तुरखिया, उपाध्यक्ष डी एम महाले, सचिव  संजयभाई पटेल,संस्थचे युवा समन्वयक हर्षिलभाई तुरखिया मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मांचारी आदींकडूनअभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments