Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अक्कलकुवा तालुक्यातील २५३ कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश

 अक्कलकुवा तालुक्यातील २५३ कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश

           अक्कलकुवा तालुक्यातील तब्बल २५३ कार्यकर्त्यांनी आमदार राजेश दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सोमावल येथे आमदार राजेश पाडवी यांच्या निवासस्थानी पार पडला.


           या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा महामंत्री बळीराम  पाडवी, जिल्हा महामंत्री कैलास चौधरी, तळोदा मंडळ अध्यक्ष दरबारसिंग पाडवी, अक्कलकुवा मंडळ अध्यक्ष भीमसिंहजी राजपूत, प्रदेश सदस्य,


सतीश वळवी, माजी सभापती पंचायत समिती तळोदा, अरुणाताई, महिला मोर्चा अध्यक्ष भाजपा,  विक्रमजी रघुवंशी, अक्कलकुवा मंडळ अध्यक्ष नितेश पाडवी, तसेच प्रदीप शेंडे, अंबालाल साठे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

                या पक्षप्रवेशामुळे अक्कलकुवा तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून आगामी काळात पक्षाच्या कार्याला अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments