तोरणमाळमध्ये ग्रामसभा आणि वनहक्क कॅम्प आयोजित
तोरणमाळ येथे आज दि. २५ रोजी ग्रामसभा घेण्यात आली असून, त्यानिमित्ताने वनविभागाच्या वतीने मायग्रेशन (स्थलांतर) विषयक नोंदी आणि वनहक्क वारस लावण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला.
या कॅम्पमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामसभेत वनहक्क कायद्यानुसार वारस नोंदणी, स्थलांतराशी संबंधित अर्ज प्रक्रिया, तसेच वनहक्क पत्रांच्या अद्ययावत नोंदींसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. कॅम्प दरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पुढील प्रक्रिया सुलभ केली. स्थलांतरित कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी जागरूकता निर्माण करण्यात आली.
या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कांविषयी अधिक माहिती मिळाली असून, त्यांना शासनाच्या योजनांशी जोडण्यास मोठी मदत होणार आहे.
.
.
.
#Nandurbar #Toranmal #वनहक्क #ForestRights #MigrationSupport #GramSabha #CollectorOfficeNandurbar #डॉमित्तालीसेठी #TribalWelfare #GovernmentSchemes #RuralDevelopment #DistrictAdministration

Post a Comment
0 Comments