Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अक्कलकुव्यातील ७५ कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश

अक्कलकुव्यातील ७५ कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश

                         अक्कलकुवा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या ७५ कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे प्रदेश महामंत्री विजय  चौधरी व आ. राजेश पाडवी यांनी स्वागत केले.



                          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून दि. 5 सप्टेंबर  रोजी अक्कलकुवा तालुक्यातील कौली, खापर, राजमोही, सिंगपूर खुर्द, सोजदान गावातील काँग्रेस पक्षाच्या 72 कार्यकर्त्यांनी प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तसेच आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा कार्यालय विजय पर्व येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

          यावेळी पक्ष प्रवेश सोहळ्यास जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी व जिल्हा महामंत्री कैलास चौधरी, शहराध्यक्ष नरेश कंकरिया, विनोद कामे, मनोज गायकवाड, भीमसिंग राजपूत, व अक्कलकुवा तालुका अध्यक्ष नितेश पाडवी, सरचिटणीस सागर गावित, वतन पाडवी, योगेश पाडवी, विकास पाडवी, प्रेम वळवी, सुनील वळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments