तळोदा येथे तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धा संपन्न
तळोदा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन ब्लॉसम इंग्लिश स्कूल, तळोदा येथे करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य आर. के. पाटील व अध्यक्ष योगेश चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. तालुका क्रीडा स्पर्धा तालुका संयोजक श्री. सुनील सूर्यवंशी तसेच क्रीडा शिक्षक निलेश सूर्यवंशी ल उपस्थित होते.
स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात अन्वी मगरे हिने प्रथम क्रमांक, मृण्मय हिवरे हिने द्वितीय क्रमांक, अश्मी मगरे हिने तृतीय क्रमांक तर मनस्वी शिरसाठ हिने चतुर्थ क्रमांक मिळवला.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात निलेश पाडवी याने प्रथम, आपसिंग तळवी याने द्वितीय, अश्विन राऊत याने तृतीय, पंकज पाडवी याने चतुर्थ तर सुमित वसावे याने पाचवा क्रमांक पटकावला.
या विजेत्या खेळाडूंनी आपले प्राविण्य सिद्ध करत जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.


Post a Comment
0 Comments