गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
`विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका निभावत दिवसभर घेतले तास`
तळोदा (प्रतिनिधी) – गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे,तर प्रमुख अतिथी सेवानिवृत्त ज्येष्ठ उपशिक्षक अनिल इंदिस उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन अध्यक्षांच्या हस्ते झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका पार पाडत दिवसभर अध्यापन केले. या वेगळ्या उपक्रमामुळे मुलींना अध्यापना चा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्यास शिक्षक पाटील वाय यु, दिलीप तडवी, वैशाली देवरे, दिनेश मराठे, ज्योती महाजन, हरिश्चंद्र कोळी आदी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी अनिल इंदिस यांनी विद्यार्थिनींना जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांनी विद्यार्थिनींच्या सादरीकरणाचे कौतुक केले व शिक्षक दिनाचे औचित्य स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री सागर यांनी तर आभार दिलीप तडवी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर सहकारी अनिल मगरे, हिरालाल पाडवी, धनराज केदार आणि सुदाम माळी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment
0 Comments