'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत शहादा नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आणि सत्कार सोहळा संपन्न
'स्वच्छता ही सेवा पंधरवाडा' अभियानाच्या अनुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शहादा नगरपरिषदेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिरात सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीबरोबरच स्वच्छ सर्वेक्षण २०२५, माझी वसुंधरा अभियान ६.० आणि स्वच्छता ही सेवा पंधरवाडा यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सत्कार सोहळ्यात मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया (IAS) आणि श्री. साजिद पिंजारी (मुख्याधिकारी, शहादा नगरपरिषद) यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी श्री. साजिद पिंजारी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक करत त्यांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच आरोग्य तपासणीत कोणताही आजार निदर्शनास आल्यास UPHC शहादा येथे योग्य उपचार व औषधे घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमावेळी श्री. गोविंदा थोरात (स्वच्छता निरीक्षक), श्री. प्रज्ञाशिल निकम (स्वच्छता निरीक्षक), श्री. भूषण सोनार (शहर समन्वयक), नगरपरिषदेचे सर्व सफाई कर्मचारी तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. हार्दिक पटेल व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होऊन त्यांना उत्तम आरोग्य सेवांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच स्वच्छतेच्या मोहिमेत त्यांच्या योगदानाचे कौतुक करून समाजात स्वच्छतेबद्दल सकारात्मक संदेश दिला गेला.
.
.
.
#स्वच्छताहीसेवा #SwachhataHiSeva #स्वच्छभारत #ShahadaNagarParishad #स्वच्छसर्वेक्षण2025 #माझीवसुंधरा #CollectorOfficeNandurbar #डॉमित्तालीसेठी #कृष्णकांतकनवरिया





Post a Comment
0 Comments