स्थलांतर रोखण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीचा पुढाकार – मनरेगा व शासकीय योजनांवर भर
धडगाव, : - ग्रामीण भागातील स्थलांतराचा प्रश्न थांबवण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आज ग्रुप ग्रामपंचायत कात्री येथे CFR क्षेत्राची शिवार फेरी घेण्यात आली.
मनरेगाद्वारे रोजगार निर्मिती:
या शिवारफेरीत वन विभाग, कृषी विभाग, पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी मा. श्री. अजय पावरा तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी अजय पावरा यांनी युक्तधारा प्रणाली, भुवन नकाशा, आतापर्यंतची कामे व पुढील नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या आर्थिक वर्षात आजपर्यंत 23,721 मनुष्यदिवसांची निर्मिती करण्यात आली असून पुढील काळात मोठ्या प्रमाणात काम सुरू करून हा आकडा लाखाच्या घरात नेण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला.
ग्रामविकासासाठी सरपंचांचा निर्धार:
गट ग्रामपंचायत कात्रीचे सरपंच मा. श्री. संदीप वळवी यांच्या नेतृत्वाखाली ही शिवारफेरी पार पडली. त्यांनी सांगितले की, मनरेगा व इतर शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून रोजगारनिर्मिती, पाणी व मृदा संवर्धन आणि शेतीला चालना दिली जाणार आहे.
'स्थलांतर रोखण्यासाठी सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली जाणार असून यामुळे ग्रामविकासाला नवी गती मिळेल' असे सरपंच वळवी यांनी नमूद केले.
हा उपक्रम स्थलांतर रोखण्यासाठी तसेच ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक आदर्श ठरेल, अशी अपेक्षा आहे.
.
.
.
#nandurbar #MGNREGA #ruraldevelopment #employment #WaterConservation #gramvikas #StopMigration





Post a Comment
0 Comments