कोट्यावधी रुपयांच्या विविध योजनेतून शहर विकासाला प्रारंभ आमदार अनुपभैय्या अग्रवाल.
राजमाता जिजाऊ मातृतीर्थ कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन..
धुळे - दि. २६
राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारकाच्या माध्यमातून देशाच्या अखंडतेला, एकतेला ज्यांच्या विचारांची गरज होती त्या राजमाता जिजाऊंचे भव्य स्मारक धुळ्यामध्ये उभारताहेत याचा मला मनस्वी आनंद होतो आहे, छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनीच खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली त्यांच्याच प्रेरणेतून अखंड हिंदुस्तान आज आपल्याला एक वेगळ्या संस्कृतीमध्ये दिसतो आहे. धुळे शहर विकासामध्ये भर घालणाऱ्या या स्मारकाच्या जिजाऊ ऐतिहासिक कार्याला आवश्यक ती सर्व मदत मी करणार आहे, शहर विकासाच्या अनेक संकल्पना मी यापूर्वीच मांडले आहेत. पांझरा नदीमध्ये टॉय ट्रेन, एमआयडीसी प्रकल्प, शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. लवकरच शहराच्या सर्वांगीन विकासाला प्रारंभ होणार आहे असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.
राजमाता जिजाऊ स्मारकसृष्टी अर्थात मातृतीर्थ जागेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीमंत बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी महापौर मोहन भाऊ नवले, प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, युवराज करनकाळ, रणजीतराजे भोसले, संजय पाटील, डॉ. सुशील महाजन, योगेश मराठे, मनसेचे बंटी सोनवणे, अशोक पाटोळे, प्रा रवींद्र निकम, शितल नवले, योगीराज मराठे, ओम खंडेलवाल, भिमसिंग राजपूत, लहू पाटील, एस. एम. पाटील, प्रा. बी. ए. पाटील आदींसह मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश खंडेलवाल, विजय मंगळे, शिवा दादा पवार,योगेश इशी, प्रशांत बागुल, नागसेन बोरसे, शिरीष जाधव, वाल्मीक जाधव, अमोल मासुळे, किशोर सरगर, भगवान वाघ आबा कदम, नैनेश साळुंखे, राजू इंगळे, सुबोध पाटील, उल्हास यादव, समाधान शेलार, जयंत वानखेडकर, कैलास मराठे, योगेश मराठे, श्रीरंग जाधव देवा पवार, कमलाकर पाटील, विजय वाघ, वसंत हरळ, गौतम गायकवाड, प्रदीप जाधव, मनपाचे सचिव मनोज वाघ, अभियंता चंद्रकांत ओगले, प्रदीप चव्हाण वर्षा पाटील, तुषार पाटील, वैभव पाटील, जयेश मगर, पप्पू ढापसे, बंडू पवार संतोष लकडे, भरत वाघारे, बबलू बागुल, ऍड. दिनेश काळे, ऍड. चंद्रकांत जावळे, ऍड. नितीन पाटील, श्याम निरगुडे, बाळू गायकवाड, दिलीप शितोळे, उल्हास पाटील, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे उपाध्यक्ष विनोद जगताप, संदीप पाटोळे, आणि कार्यकारणीचे सदस्य सुधाकर बेंद्रे,अतुल पाटील, साहेबराव देसाई, अशोक सुडके, राजेंद्र थोरात, मनोज ढवळे, किशोर वाघ, विकास बाबर, दीपक रौंदळ, राहुल गायकवाड, प्रशांत नवले, सुभाष शिंदे, वीरेंद्र मोरे, महेश गायकवाड, तुषार नवले, कैलास वाघारे आदींच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व मान्यवरांचा परिचय सचिव निंबा मराठे, यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. आभार प्रदर्शन राहुल गायकवाड यांनी केले. तसेच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली..


Post a Comment
0 Comments