इमिनेन्स पावर स्कूलच्या विद्यार्थ्यांची हुतात्मा स्मारकास भेट
नंदुरबार(प्रतिनिधी) शहीद दिनी हुतात्मा स्मारकास पुष्पार्पण केल्यानंतर येथील इमिनेन्स पावर स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार के शहीद अमर रहे... अमर रहे... अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
स्वातंत्र्य लढ्यात शालेय जीवनात बलिदान देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार मेहता व सहकारी यांच्या शहीद दिनी 9 सप्टेंबर रोजी सकाळी इमिनेन्स पॉवर पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी माणिक चौकातील स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.इमिनेन्स पॉवर स्कूलच्या शिक्षिका सौ. शुभांगी गव्हाणे, कु.सानिया मिर्झा यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि बालवीर सहकाऱ्यांच्या बलिदाना बाबत शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.


Post a Comment
0 Comments