Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या जिल्हा समन्वयकपदी दिपक मराठे यांची निवड

  मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या जिल्हा समन्वयकपदी दिपक मराठे यांची निवड

              तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील दिपक बबन मराठे यांची मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.

                   या नियुक्तीचे पत्र नुकतेच मराठा समाज परिवर्तन चळवळीचे मुख्य समन्वयक विठ्ठल मराठे यांच्या हस्ते दिपक मराठे यांना देण्यात आले असून मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या उद्दिष्टपुर्तीसाठी सक्रिय सहभाग व मार्गदर्शन करणे. तसेच आपल्या हातुन होणाऱ्या समाज कार्याची मंडळाच्या कार्याची गुणवत्ता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी आपण आपल्या कार्यकुशलतेने आणि नेतृत्वाने चळवळीची उभारणी व प्रगती साधाल तसेच मंडळ बांधणी उत्तमरित्या करून मंडळ मजबूत करण्यासाठी आपण योगदान द्याल असा ठाम विश्वास वाटतो. तर मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या सर्व सदस्यांशी समन्वय साधून समाजातील बांधवांना सकारात्मकतेकडे नेण्याचा प्रयत्न कराल यासाठी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. या नियुक्तीबद्दल दिपक मराठे यांचे चिनोदासह परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments