चि.मोक्षित शेंडे जिल्हास्तरीय तेंग सु डो (कोरियन कराटे) स्पर्धेत सुवर्णपदक.
नंदुरबार ( प्रतिनिधी )- येथील नंदुरबार जिल्हा तेंग सु डो असोसिएशन यांच्या सहयोगाने जिल्हास्तरीय निवड चाचणी चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात अहिंसा इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थी कु.मोक्षीत शेंडे यांने अटीतटीच्या शेवटच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे कौशल्य दाखवत सुवर्णपदक पटकाविले. सदर खेळाडूची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली असून उपशिक्षिका श्रीमती दिपिका राणे यांचा चिरंजीव आहे. त्याला अमूल्य मार्गदर्शन क्रिडा शिक्षक राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सौ.दिपाली साळुंखे-शिंदे मॅडम व नंदुरबार टेंग सू डो सचिव डॉ. दिनेश बैसाणे यांचे लाभले.


Post a Comment
0 Comments