Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम येथे शिक्षक दिवस साजरा

 तळोदा एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम येथे शिक्षक दिवस साजरा 

                                 तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम येथे गुरुवार दि. 4 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते.

                       शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडताना वर्ग अध्यापनाचे कार्य पार पाडले. शिक्षकाला शिकवताना पूर्वतयारी कशी करावी लागते. या सर्वांचा अनुभव यावेळेस या विद्यार्थी शिक्षकांना मिळाला. ज्ञानदान हे पवित्र कार्य असून भावी पिढी निर्माण करण्याचे पवित्र कार्य आहे असे मुख्याध्यापक नाईक सरांनी सांगितले.

               इयत्ता आठवीची तन्वी गणेश मराठे या विद्यार्थिनीने शिक्षकांवर कविता सादर केली. पाचवीच्या विद्यार्थी हितेश पोकराराम पटेल याने डॉ . राधाकृष्णन यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.


या वेळी शिक्षकांसाठी यज्ञा दीपक सूर्यवंशी, साक्षी राठोड या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळांचे आयोजन केले होते. 

 कार्यक्रमाचे रूपरेषा व सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक प्रीत देवेंद्र सोनगढवाला, नुपुर मुकेश वाणी यांनी केले. शिक्षकांप्रती  कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

Post a Comment

0 Comments