तलावडी येथे आश्रम शाळेत गणवेश वाटप
प.खा.भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तलावडी येथे संस्थेचे समन्वयक जयदीप नटावदकर यांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी राजेंद्र गोसावी तसेच नंदुरबार येथील श्रीमती देवयानी वळवी उपस्थित होत्या.
सालाबादप्रमाणे दरवर्षी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश व शालेय गणवेश असे दोन गणवेश प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जातात. गणवेश मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गणवेश वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.




Post a Comment
0 Comments