Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह संपन्न

 कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह संपन्न

      तळोदा येथील आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दि. 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे औचित्य साधून दि. 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आला.

 राष्ट्रीय सेवा योजनेच्या या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. दि. 22 सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानास स्मरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दि. 23 सप्टेंबर  रोजी भारतरत्न लोहपुरुष  सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती निमित्ताने त्यांनी भारताची अखंडता कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. दि. 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी महाविद्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजने संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दि. 25 सप्टेंबर रोजी अंत्योदय  दिवस निमित्ताने महाराष्ट्र शासनाने लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. दि. 26 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्त्व याबाबत जनजागृती व्हावी यासाठी महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. दि. 27 सप्टेंबर रोजी विश्व पर्यटन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा युनेस्को च्या यादीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे महाराजांच्या कार्याबद्दल व त्यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापना व प्रेरणादायी इतिहास यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दि. 28 सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग जयंती साजरी करून युवकांमध्ये देशभक्ती, साहस व सामाजिक जबाबदारी ची जाणीव व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दि. 29 सप्टेंबर रोजी विश्व हृदय दिवसनिमित्ताने आरोग्य पोषण आहार, सिकलसेल, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादींविषयी विद्यार्थ्यांना मौलिक माहिती देण्यात आली.

 यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत दलाल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कैलास पद्मर यांचे सप्ताह आयोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.रोहित पिंपरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.संगम यशोद व महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती मगरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments