तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसहाय केंद्राद्वारे आरओ फिल्टर पाणपोईचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न
तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कै. कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णसहाय केंद्राने आरओ फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे.
या पाणपोईचे उद्घाटन आज आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटन समारंभात भाजपा प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, विवेक पाडवी, बळीराम पाडवी, महामंत्री कैलास चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी श्याम राजपूत तसेच तालुकाध्यक्ष दरबारसिंग पाडवी, दारासिंग वसावे, नारायण ठाकरे, शहराध्यक्ष गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, योगेश मराठे, भरत चौधरी, प्रा. विलास डामरे, अनिल परदेशी, अंबालाल साठे, प्रविण राजपूत, सुभाष जैन, शानूबाई वळवी, नीलाबेन मेहता, अनिता कलाल, संजय वाणी, कल्पेश पाटील, ईश्वर पाडवी, सुभाष चौधरी, विनोद पाडवी, जगदीश परदेशी, योगेश गुरव, चेतन शर्मा, गुलाब जोहरी, अमन जोहरी, निलेश वळवी, चिंगा पाडवी, कृष्णा पाडवी, अरुण बागले, राजु प्रधान, योगेश पाडवी, गुड्डू वळवी, किरण सूर्यवंशी, दीपक जयस्वाल, प्रफुल माळी आणि प्रकाश शर्मा, मुकेश बिरारे, अण्णा पाटील, राकेश महाले, रोहन गुरव आदि उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments